पृथ्वीच्या अंतरंगाची माहिती कशी मिळते ?
- पृथ्वीची त्रिज्या (Radius) ही ६३७० कि.मी. एवढी आहे. पृथ्वीच्या अंतर्गत परिस्थितीमुळे आपणास पृथ्वीच्या केंद्राजवळ पोहोचणे अशक्य आहे. तरीही आपणास याबद्दलची माहिती पुढील स्रोतांपासून ज्ञात होते.
प्रत्यक्ष स्रोत - (Direct Sources)
- पृथ्वीच्या अंतर्गत संरचनेबाबत माहिती आपणास भूपृष्ठीय खडकांपासून किंवा खनन शेत्रातून प्राप्त खडकांपासून होते.
- ज्वालामुखी उद्रेक (Volcanic Eruption) हा प्रत्यक्ष माहितीचा एक अन्य स्रोत आहे.
- पदार्थांच्या गुणधर्माचे विश्लेषण केल्यास आपणास पृथ्वीच्या अंतर्गत भागाची माहिती प्राप्त होते. खाणकाम क्रियांनी आपणास माहिती मिळते कि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आत केंद्राकडे गेल्यास तापमान व दाब यात यात वृद्धी होते. यासोबत आपणास ही देखील माहिती मिळते की खोली वाढण्याबरोबर पदार्थाची घनता (Density) देखील वाढते.
- पृथ्वीच्या अंतरंगाबद्दल माहितीचा दुसरा अप्रत्यक्ष स्रोत म्हणजे उल्काखंड (Meteors) होय.
- उल्काखंडापासून प्राप्त पदार्थ व त्यांची संरचना ही पृथ्वीशी मिळती-जुळती असते.
- गुरुत्वाकर्षण (Gravitation), चुंबकीय क्षेत्र (Magnetic Field), व भूकंप हे सुद्धा अप्रत्यक्ष स्रोत आहेत.
- पृथ्वीच्या पृष्ठभागावर विभिन्न अक्षवृत्तावर गुरुत्वाकर्षण बल एकसारखे नाही. हे बल ध्रुवावर अधिक तर विषुवृत्तावर (Equator) कमी आहे. पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थाचे असमान वितरणदेखील या भिन्न्तेस प्रभावित करते.
- वेगवेगळ्या स्थानावरील गुरुत्वाकर्षणातील फरक हा इतर अनेक घटकांनी प्रभावित होत असतो, या फरकास गुरुत्वाकर्षण विसंगती (Gravitational Anomaly) असे म्हटले जाते.
- भूकंप क्रिया या पृथ्वीच्या अंतर्गत माहितीचे प्रमुख स्रोत आहेत.
भुकंपावर अधिक माहिती साठी येथे क्लिक करा
पृथ्वीची अंतर्गत रचना
पृथ्वीची अंतर्गत रचना ही मुख्य करुण तीन भागात विभागलेली आहे. शिलावरण, प्रावरण आणि गाभा.
शिलावरण / कवच (Lithosphere / Crust)
- हा पृथ्वीवरील सर्वात वरचा थर आहे. याची जाडी ८ ते ४० कि.मी. पर्यंत असते.
- हे बाह्य कवच अतिशय ठिसूळ असते. शिलावरणाची जाडी ही खंड व महासागराखाली वेगवेगळी असते. महासागराखाली शिलावारणाची जाडी ही खंडाच्या शिलावरण जाडीपेक्षा कमी असते.
- महासागराच्या खाली याची सरासरी जाडी ५ कि.मी. आहे तर खंडाच्या शीलावरणाची जाडी ३० कि.मी. आहे. प्रमुख पर्वतीय शृंखलाखाली ही जाडी अजून जास्त आठळते जसे की, हिमालाय पर्वतशृंखलेखालील शीलावरणाची जाडी जवळ-जवळ ७० कि.मी. पर्यंत आहे.
- शिलावरण हे जड खडकांनी बनलेली असते, जेथे याची घनता (Density) 3 ग्रॅम / घन सेंटीमीटर आहे.
- महासागराखालील शिलावरण हे बेसाल्ट खडकांनी बनलेली असते. महासागरात खाली शिलावारणाची जाडी 2.७ ग्रॅम प्रती घन से.मी. आहे.
- जवळपास पृथ्वीचे १% घनफळ आणि ०.५% वस्तुमान हे शिलावरणाने बनलेले आहे. शिलावरणा मध्ये मुख्य घटक Silica(Si) आणि Aluminium(Al) असतात म्हणून याला सियाल सुद्धा म्हटले जाते.
- शिलावरणाच्या खालच्या भागास प्रावरण म्हंटले जाते.
- शिलावरण व प्रावरण या दोन थराना वेगळ्या करणाऱ्या थरास 'मोहो विलगता' (Moho Discontinuity) असे म्हणतात.
- प्रावरण थराचा विस्तार भूपृष्टाखाली ४२ कि.मी. पासून २९०० कि.मी. पर्यंत आहे.
- प्रवारणाच्या वरच्या भागास 'दुर्बलावरण'(Asthenosphere) असे म्हणतात. याचा विस्तार हा पृथ्वीच्या अंतरंगात ८० ते २०० कि.मी. पर्यंत आढळते. दुर्बलावरण खूप लवचीक असतो.
- ज्वालामुखी उद्रेकात भूपृष्ठावर येणारा लाव्हा हा दुर्बलावरणात निर्माण होत असतो.
- प्रावरणाची घनता ही शिलावरणापेक्षा अधिक असते. प्रावरणाची घनता ३.४ ग्रॅम / घन से.मी. एवढी असते.
गाभा (Core)
- पृथ्वीच्या अंतरंगातील सर्वात आतील थरास गाभा म्हणतात. गाभ्याचा विस्तार हा पृथ्वीच्या अंतरंगात २९०० कि.मी. पासून ६३०० कि.मी. पर्यंत आढळतो.
- गाभा दोन अवस्थेत आढळतो, द्रव्य आणि घन अवस्थेत
- प्रावरण आणि गाभा या दोन थाराना वेगळ्या करणाऱ्या भागास गुटनबर्ग विलगता (Gutenberg's Discontinuity) असे म्हणतात.
- बाह्य गाभा हा द्रव्य अवस्थेत (Liquid State) आहे, तर अतंर्गत गाभा हा घन अवस्थेत (Solid State) आहे
- प्रावरण व गाभ्याच्या सीमेवरील खडकांचे घनत्व हे ५ ग्रॅम / घन से.मी. एवढे आहे, तर केंद्रात ही घनता १३ ग्रॅम / घन से.मी. एवढी आढळते.
- गाभ्याची निर्मिती ही निकेल व लोह यांसारख्या जड पदार्थांची झालेली आहे. या थरास 'निफे' (Nife- Nickel + Ferrous) या नावाने सुद्धा ओळखले जाते.
No comments:
Post a Comment