Saturday, 17 February 2018

घटनानिर्मिती | संविधान निर्मिती | Making of The Indian Constitution

एम.एन.रॉय यांनी सन १९३४ मध्ये पहिल्यांदाच घटना समितीची संकल्पना मांडली एम.एन.रॉय हे भारतातील साम्यवादी चळवळीचे प्रणेते आणि पुरोगामी लोकशाहीवादाचे समर्थक होते.

त्यानंतर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस ने १९३५ मध्ये भारताच्या राज्यघटनेची निर्मिती करण्यासाठी इंग्रजांपुढे औपचारिकरित्या घटना समितीची मागणी केली.

तीन वर्षानंतर १९३८ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारतीय राष्टीय कॉंग्रेसच्या वतीने मागणी केली कि, भारतीय राज्य घटनेचीनिर्मिती ही प्रौढ मतदारांनी निवडून आलेल्या सदस्यांनीच करावी.

अखेर इंग्रजांनी सन १९४० मध्ये ही मागणी जशी च्या तशी मान्य केली, या मागणीला ऑगस्ट संधी नावाने ओळखले जाते.

सन १९४२ मध्ये सर स्टँफोर्ड क्रिप्स हा भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा मसुदा घेऊन भारतात आला.

पण त्याचवेळी मुस्लीम लीग ने भरताचे दोन स्वतंत्र देशात निर्मिती करावी व दोन वेगवेगळ्या घटना समित्या बनवाव्या अशी मागणी करून क्रिप्स चे प्रस्ताव नाकारले.

यानंतर भारतात कॅबिनेट मिशनला पाठविण्यात आले. या कॅबिनेट मिशनने दोन वेगळ्या समितीच्या मागणीला नाकारले पण मुस्लीम लीग ला मान्य होईल अशी संविधान सभेची योजना सादर केली.

कॅबिनेट मिशनने १९४६ मध्ये संविधान सभेची स्थापना केली. या सभेची वैशिष्टे पुढीलप्रमाणे होती.
  1. संविधान सभेत एकूण ३८९ सदस्य असतील. त्यापैकी २९६ जागा ब्रिटीश भारतासाठी होत्या आणि ९३ जागा संस्थानांसाठी होत्या. ब्रिटीश भारतातील २९६ जागांपैकी २९२ जागा गव्हर्नर असलेल्या ११ प्रांतामधून भरावयाच्या होत्या आणि प्रत्येकी १ याप्रमाणे ४ जागा चार मुख्य आयुक्तांच्या प्रांतामधून भरावयाच्या होत्या.
  2. प्रांतामध्ये प्रत्यकी १० लाख लोकासंखेमागे १ सदस्य असणार होता.
  3. ब्रिटीश प्रांतांना दिलेल्या २९६ जागा मुस्लीम, शिख सर्वसाधारण या तीन प्रमुख समुदायांमध्ये त्यांच्या लोकसंखेच्या प्रमाणात दिल्या जाणार होत्या.
जागा अशा प्रकारे राखीव ठेवण्यात आल्या होत्या
  • सर्वसामान्यांनसाठी २१० जागा
  • मुस्लिमांसाठी ७८ जागा
  • शिखांसाठी ४ जागा
  • इतरांसाठी ४ जागा
या २९६ जागांसाठी जुलै-ऑगस्ट १९४६ मध्ये निवडणुका घेण्यात आल्या. हे सदस्य अप्रत्यक्ष रीतीने निवडले जाणार होते.

या निवडणुकीचा निकाल अश्या प्रकारे होता
  • भारतीय राष्ट्रीय काँगेसने २०८ जागा जिंकल्या
  • मुस्लीम लीग ला ७३ जागा मिळाल्या
  • उरलेल्या १५ जागा छोटे गट व अपक्ष उमेदवारांना मिळाल्या
संस्थानांनी घटनासमितीत भाग न घेण्याचा निर्णय घेतला होता म्हणून त्यांना दिलेल्या ९३ जागा रिकाम्या राहिल्या होत्या.

९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीची स्थापना झाली व घटनासमितीची पहिली बैठक याच दिवशी भरली. पण मुस्लीम लीग ने या बैठकीवर बहिष्कार घातला व वेगळ्या पाकिस्तान ची मांग केली. म्हणून या बैठकीत २११ सदस्य उपस्थित होते

फ्रान्समधील प्रथेचे अनुकरण करून वयाने सर्वात ज्येष्ट असलेले सदस्य डॉ. सच्चिदानंद यांची सभेची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केले गेले व फ्रैंक एन्थोनी यांची हंगामी उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आले.

संविधान सभेची दुसरी सभा ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. सच्चिदानंद च्या अध्यक्षतेखाली भरविण्यात आली. या सभेत डॉ. राजेन्द्रप्रसाद आणि एच.सी.मुखर्जी यांना सभेचे अनुक्रमे कायमस्वरूपी अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

सर बी.एन.राव यांना सभेचे घटनात्मक सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले, आणि घटनासामितीचे वर्ताकार म्हणून डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन ची निवड करण्यात आली.

घटनानिर्मितीसाठी एकूण २६ समित्या व उपसामित्यांची निवड करण्यात आली होती

त्यांपैकी काही महत्वाच्या समित्या खालीलप्रमाणे होत्या
  1. संघराज्यीय राज्यघटना समिती : जवाहरलाल नेहरू
  2. संघराज्यीय अधिकार समिती : जवाहरलाल नेहरू
  3. प्रांतिक राज्यघटना समिती : सरदार पटेल
  4. मसुदा समिती : डॉ. बी. आर. आंबेडकर
  5. मुलभूत अधिकार व अल्पसंख्याक आणि आदीवासी व अंतर्भूत न केलेली क्षेत्रे याबाबत सल्लागार समिती : सरदार वल्लभभाई पटेल
फाळणी

3 जून १९४७ रोजी माउंटबेटनच्या योजने नुसार भारताची फाळणी करण्यात आली

या फाळणी मुळे पश्चिम पंजाब, सिंध, बलुचिस्तान, वायव्य सीमा प्रांत, पूर्व बंगाल व आसाम मधील सिल्लेर जिल्हा मिळून पाकिस्तान हा वेगळा देश बनला

३१ ऑक्टोबर १९४७ रोजी घटना समितीची पुनर्रचना करण्यात आली

पुनर्रचना नंतर घटनासमितीच्या सभासदांची संख्या २९८ इतकी करण्यात आली आणि त्याची विभागणी पुढील प्रकारे करण्यात आली
  • २२६ सदस्य भारतीय प्रांतातून
  • 3 चीफ कमिशनर प्रांताकडून
  • आणि संस्थानिकांसाठी 70 जागा निर्धारित करण्यात आल्या
या निवडून आलेल्या घटना समितीच्या संख्यान मध्ये १५ महिला सदस्यांचा समावेश होता
घटनानिर्मिती सभेचे महिला सदस्य - येथे click करा
घटनासमितीने केलेली कामे

१३ डिसेंबर १९४६ रोजी जवाहरलाल नेहरूंनी घटना समितीच्या 'उद्धीष्टांचा ठराव' सभेपुढे मांडला

त्यानंतर २१ जानेवारी १९४७ रोजी सभेने हा ठराव स्वीकार केला

आज आपल्या संविधानाचा सरनामा हा या ठरावाची सुधारित आवृत्ती आहे

यासोबत घटना समितीने इतर अनेक कायदे केले त्यातील काही खालीलप्रमाणे आहेत
  1. मे १९४९ मध्ये घटना समितीने भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता दिली
  2. घटना समितीने २२ जुलै १९४७ रोजी भारताचा राष्ट्रध्वज  स्वीकृत केला. त्याची design पिंगली वेंकय्या यांनी केली होती.
    घटनासमितीची शेवटची सभा २४ जानेवारी १९५० रोजी भरविण्यात आली होती. त्याच दिवशी
  3. घटनासमितीने राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि राष्ट्रचिन्ह स्वीकृत केले
  4. आणि याच दिवशी म्हणजेच २४ जानेवारी १९५० रोजी घटनासमितिला हंगामी संसदेत रुपांतरीत केले गेले आणि या घटनासमितीने डॉ. राजेन्द्रप्रसाद यांना भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून दिले
घटनासमितीने एकूण २ वर्षे, ११ महिने, १८ दिवस कार्य केले. त्यात समितीचे एकूण ११ सत्रे झाली

घटनासमितीने एकूण ६० देशांच्या घटनेचा आधार घेतला होता. आणि घटनानिर्मितीसाठी एकूण ६४ लाख रुपयांचा खर्च आला होता

मसुदा समिती

घटनासमितीची सर्वात महत्वाची समिती म्हणजेच मसुदा समिती आहे

या समितीला २९ ऑगस्ट १९४७ रोजी स्थापना करण्यात आले

या समितीकडे नवीन राज्यघटना बनिवण्याचे काम सोपविण्यात आले होते

या समिती मध्ये एकूण सात सदस्य होते जे खालील प्रकारे आहे
  1. बी. आर. आंबेडकर (अध्यक्ष)
  2. एन. गोपालस्वामी आय्यंगार
  3. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर
  4. डॉ. के. एम. मुन्शी
  5. सईद मोहम्मद सादुल्ला
  6. एन. माधव राव (प्रकृतिच्या अस्वस्थतेमुळे बी. एल. मित्तर यांनी राजीनामा दिल्याने, त्यांच्या जागी)
  7. टी. टी. कृष्णम्माचारी (डी. पी. खैतान यांचे १९४७ मध्ये निधन झाल्याने त्यांच्या जागी)
मसुदासमितीने फेब्रुवारी १९४८ साली भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा घटनासमिती समोर सदर केला

या मसुद्यावर घटनासमिती मध्ये एकूण तीन वाचन करण्यात आले
  • पहिले वाचन : ४ नोव्हेंबर १९४७ ते ९ नोव्हेंबर १९४८
  • दुसरे वाचन : १५ नोव्हेंबर १९४८ ते १७ ऑक्टोबर १९४९
  • तिसरे वाचन : १४ नोव्हेंबर १९४९ ते २६ नोव्हेंबर १९४९
मसुद्याच्या पहिल्या वाचनानंतर जनतेची मते, टीका आणि सूचना विचारात घेऊन मसुदा समितीने दुसरा मसुदा तयार केला

या वाचानादरम्यान भारतीय जनतेकडून १७५३ सूचना व तक्रारी आल्या होत्या त्यापैकी २४७३ तक्रारींचे घटनानिर्मितीसाठी विर्वाचन करण्यात आले

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय घटनेचे शिल्पकार असे म्हणतात. कारण त्यांनी भारतीय घटना निर्मितीसाठी आपले मोलाचे योगदान दिलेले आहे.

राज्यघटनेचा स्वीकार 


२६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना स्वीकृत करण्यात आली यावर २९९ पैकी २८४ सदस्यांनी स्वाक्षरी केली. कारण  त्या दिवशी २९९ सदस्यांपैकी फक्त २८४ सदस्यच उपस्थित होते

या दिवशी स्वीकृत केलेल्या राज्यघटनेत सरनामा, २२ भाग, ३९५ कलमे आणि ८ परिशिष्ट होते

सध्याच्या काळात भारताच्या राज्यघटनेत ४५२ कलमे, २६ भाग आणि १२ परिशिष्ट आहेत

२६ जानेवारी १९५० पासून देशाचा कारभार नवीन राज्यघटनेनुसार सुरु करण्यात आला. म्हणून या दिवसाला आपण प्रजासत्ताक दिन म्हणून देशभर साजरा करतो

२६ जानेवारी १९३० ला भारताचा प्रथम स्वतंत्र दिन म्हणून साजरा करण्यात आला होता. म्हणूनच या दिवशी नवीन राज्यघटनेनुसार देशाचा कारभार सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.

No comments:

Post a Comment